धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:41+5:302021-06-16T04:24:41+5:30
परभणी : येत्या दोन-तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तेव्हा शहरातील धोकादायक इमारती असणाऱ्या मालकांना नोटिसा देऊन सतर्क ...
परभणी : येत्या दोन-तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तेव्हा शहरातील धोकादायक इमारती असणाऱ्या मालकांना नोटिसा देऊन सतर्क करावे, अशा सूचना महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.
रविवारी रात्री तालुक्यात अतिवृष्टी झाली. पिंगळगड नाल्याच्या पुराचे पाणी दोन वसाहतींत शिरुन या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली होती. महानगरपालिकेने या भागात उपाययोजना सुरू केल्या आहेत. या भागातील नागरिकांना जेवण आणि पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस होऊन घरात पाणी शिरण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणांचा शोध घ्यावा, धोकादायक इमारत असणाऱ्या मालकांना नोटिसा देऊन सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे कळवावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग समिती स्तरावर आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणासाठी पथके स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.