देव गेले चोरीला ! खिडकी तोडून चोरटे आत आले, मालकाला जाग येताच चांदीच्या ५ मुर्त्या घेऊन पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 12:28 PM2021-10-11T12:28:44+5:302021-10-11T12:33:03+5:30

crime in Parabhani : पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्याने मागील भागातील खिडकीच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश केला.

God is gone! The thieves broke through the window and entered, taking 5 silver idols as soon as the owner woke up | देव गेले चोरीला ! खिडकी तोडून चोरटे आत आले, मालकाला जाग येताच चांदीच्या ५ मुर्त्या घेऊन पळाले

देव गेले चोरीला ! खिडकी तोडून चोरटे आत आले, मालकाला जाग येताच चांदीच्या ५ मुर्त्या घेऊन पळाले

Next

पाथरी ( परभणी ) : शहरातील शिवाजी नगर भागात आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चक्क देवघरातील ७०० ग्राम वजनाच्या ५ चांदीच्या मूर्ती लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

पाथरी शहरातील  शिवाजी नगर भागातील देवनांदरा शाळेच्या समोर  बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे पदाधिकारी  प्रभाकर शिंदे यांचे घर आहे  नेहमी प्रमाणे कुटुंबासोबत बेडरूममध्ये झोपले होते. सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्याने मागील भागातील खिडकीच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश केला. चोरटे थेट देवघराकडे गेले त्याच वेळी प्रभाकर शिंदे यांच्या पत्नीला अचानक जाग आली. घरात कशाचा तरी आवाज येत असल्याचे लक्षात आल्याने दोघेही उठले. यामुळे चोरट्याने घरातून लागलीच पोबारा केला. मात्र, शिंदे यांनी नंतर पाहणी केली असता देवघरातील ७०० ग्राम वजनाच्या चांदीच्या ५ मूर्ती लंपास झाल्याचे आढळून आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागला नाही. प्रभाकर शिंदे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पेट्रोलिंगची गाडी याच भागात
स्थानिक पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत असताना याच भागात होते. त्याच वेळी चोरट्यांनी या भागात चोरी केली आहे.  त्यामुळे पेट्रोलिंगला येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन चोरटे हात साफ करत आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: God is gone! The thieves broke through the window and entered, taking 5 silver idols as soon as the owner woke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.