गोदावरीला महापूर; पाथरीच्या तीन बंधाऱ्यातून २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 06:21 PM2021-09-28T18:21:13+5:302021-09-28T18:21:41+5:30
flood to Godawari : गोदावरी नदीपात्रातील ठाणेगाव, मुदगल आणि तारूगव्हाण या बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले
पाथरी : अतिवृष्टीच्या पावसाने मराठवाड्यामध्ये हाहाकार माजवल्यानंतर गोदावरी नदीला प्रचंड पूर आला आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव मुदगल आणि तारूगव्हाण या तीनही बंधाऱ्यातून दोन लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या पात्रात माजलगाव धरणातून तसेच जालना जिल्ह्यातील लोणी सावंगी बंधाऱ्यातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गोदावरीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे, प्रशासनाने गोदा काठच्या गावांना अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे
तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस पडत असून मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गोदावरी नदीला ही मागील पंधरा दिवसांपासून पूर आलेला आहे. गोदावरी नदीपात्रातील ठाणेगाव, मुदगल आणि तारूगव्हाण या बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज या बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग दोन लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यात आलेला आहे. माजलगाव येथील धरणातून गोदावरीच्या पात्रात 88 हजार क्युसेक पाणी आवक होत आहे. तर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी सावनी या बंधाऱ्यातून पावणे दोन लाख क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे या भागात गोदावरी नदीचे पात्र ओथंबून वाहत आहे.
बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग :
ढालेगाव .. 2 लाख 9 हजार 277 कुसेस
तारुगव्हान .. 2 लाख 7 हजार 146 कुसेस
मुदगल .. 2 लाख 41 259 कूसेस