गोदावरी पात्रातील मंदिरे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:02+5:302021-09-07T04:23:02+5:30
गोदावरी नदीवरील बंधारे पाण्याने शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गंगाखेड शहराजवळ गोदावरी ...
गोदावरी नदीवरील बंधारे पाण्याने शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गंगाखेड शहराजवळ गोदावरी नदीला पूर आला आहे. नदी घाटावर असलेली सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. नृसिंह मंदिर अद्याप पूर्णपणे पाण्याखाली गेले नाही. हे मंदिर पाण्याखाली गेल्यास पूरस्थिती सीमारेषेपर्यंत पोहोचते, असे सांगितले जाते. सद्य:स्थितीला तुळतुब घाट, वैष्णव घाट, नृसिंह घाट हे तिन्ही घाट पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. सायंकाळी पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. गोदाकाठच्या वसाहतीतील नागरिकांना नगरपालिकेने सावधानतेचा इशारा दिला आहे.
३७० मीटरपर्यंत पोहोचली पातळी
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीची पाणी पातळी ३७०.३४० मीटर एवढी आहे. सध्या २ लाख २७ हजार लिटर पाणी प्रतिसेकंद नदीपात्रात येत आहे.