महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:28+5:302021-08-15T04:20:28+5:30

शहरातील कृषी नगर भागातील केवळाबाई विश्वनाथ खरात या ११ ऑगस्ट रोजी सोन्याचे दागिने मोडण्यासाठी बाजारपेठेत आल्या होत्या. मात्र त्यांनी ...

The gold ornaments in the woman's purse lengthened | महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने लांबवले

महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने लांबवले

Next

शहरातील कृषी नगर भागातील केवळाबाई विश्वनाथ खरात या ११ ऑगस्ट रोजी सोन्याचे दागिने मोडण्यासाठी बाजारपेठेत आल्या होत्या. मात्र त्यांनी दागिने मोडले नाहीत. त्या दुपारच्या सुमारास ऑटोरिक्षामध्ये बसून जात असताना गंगाखेड नाका भागातील पिंगळगड नाल्यापर्यंत गेल्यानंतर केवळाबाई खरात यांनी त्यांची पर्स तपासली, केव्हा मोडीला आणलेले सोन्याचे दागिने पर्समध्ये नसल्याचे दिसून आले. ऑटो प्रवास करीत असताना चोरट्यांनी हे दागिने लांबविल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली आहे. चोरट्यांनी ६८ हजार २८० रुपयांचे दोन तोळ्याचे दागिने तसेच ५०० रुपयांचा चांदीचा एक दागिना असा एकूण ६८ हजार ७८० रुपयांचे दागिने लांबविले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस कर्मचारी होंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: The gold ornaments in the woman's purse lengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.