आनंदवार्ता ! परभणी जिल्हा कोरोनामुक्त ; पॉझिटिव्ह तरुणांचा तिसरा अहवालही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:46 AM2020-04-27T10:46:40+5:302020-04-27T10:47:10+5:30
यासोबतच संपर्कातील सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुस-यांदाही निगेटिव्ह आले.
परभणी : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा तिसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे़. त्यामुळे परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण १३ एप्रिल रोजी पुण्याहून दुचाकीने परभणीतील एमआयडीसी भागात नातेवाईकांकडेआला होता़ या तरुणाची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच या तरुणाच्या निमित्ताने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले़ त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुस-यांदाही निगेटिव्ह आले़ त्यानंतर शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या स्वॅबचा दुसरा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला़ होता. त्यामध्ये सदरील स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर रविवारी या तरुणांचा तिसरा स्वॅब घेण्यात आला. याबाबतचा अहवाल सोमवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला. त्यात या तरुणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. त्यामुळे परभणी जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे.