बाभळी येथे आरोग्य उपकेंद्रास शासनाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:57+5:302021-08-29T04:19:57+5:30
परभणी तालुक्यातील बाभळी येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार ...
परभणी तालुक्यातील बाभळी येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार यासंदर्भात शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या गावात आरोग्य उपकेंद्र होणार आहे. नवीन आरोग्य उपकेंद्रात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था, बाह्य रुग्ण सेवा आणि स्त्री रुग्ण तपासणी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागणार आहे. तसेच इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीतून तरतूद करायची आहे.
सभापती आणेराव यांचा पाठपुरावा
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती अंजली गंगाप्रसाद आणेराव यांनी बाभळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची याबाबत भेटही घेतली होती. या पार्श्वभूमीवर या आरोग्य उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे.