परभणीत मनपाच्या वाहनांना बसविली जीपीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:41 AM2017-12-27T00:41:10+5:302017-12-27T00:41:21+5:30
महानगरपालिकेच्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मनपाच्या घंटागाड्यांसह इतर अशा ८९ वाहनांवर जीपीएस बसविले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मनपाच्या घंटागाड्यांसह इतर अशा ८९ वाहनांवर जीपीएस बसविले आहे़
शहरातील स्वच्छता, कचºयाची वाहतूक करणे यासह इतर कामांसाठी महानगरपालिकेकडे वाहनांचा वापर केला जातो़ दररोज ही वाहने शहरात फिरतात़ अनेक वेळा ही वाहने इतरत्र फिरविली जातात़ त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता़ त्यामुळे वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने जीपीएस यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला़
यापूर्वी शहरातील घंटागाड्यांना ही यंत्रणा बसविली होती़ यावर्षी मात्र सर्वच वाहनांना जीपीएस सुरू करण्यात आले आहे़ शहरातील वसाहतींमध्ये फिरून कचरा जमा करण्यासाठी ७१ घंटागाड्या आहेत़ या घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली़
महापालिकेच्या मालकीचे आणि भाड्याने घेतलेल्या एकूण १५ ट्रॅक्टरसह इतर वाहनांना जीपीएस सुरू करण्यात आले आहे़ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे ३२ लाख रुपयांचा खर्च लागला असून, तीन वर्षांचा करार जीपीएस कंपनीशी करण्यात आला आहे़
डिझेल चोरीलाही बसणार आळा
४मनपाच्या वाहनांमध्ये डिझेल भरतानाही गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन डिझेलवरही नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत़ त्या अंतर्गत फ्युअल सेंटर प्रणाली बसविली जाणार आहे़ फ्युअल सेंटरमुळे चालकाने वाहनात किती डिझेल भरले याची माहिती मनपाला उपलब्ध होणार आहे़ येत्या १५ दिवसांमध्ये हे फ्युअल सेंटर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़