तीन कोटींच्या निधीतून ग्रामपंचायत विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:49+5:302021-03-07T04:16:49+5:30
पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला २९ कोटी ९२ लाख ९३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून जिल्हा परिषद ...
पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला २९ कोटी ९२ लाख ९३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून जिल्हा परिषद स्तरावर १० टक्क्यांप्रमाणे २ कोटी ९९ लाख २९ हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या निधीतून करावयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
प्राप्त झालेल्या निधीमधून लहान मुलांचे लसीकरण, कुपोषण निर्मूलन, ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता बांधकाम व दुरुस्ती, दोन ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता बांधकाम व दुरुस्ती, सौर पथदिवे उभारणे, स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, ग्रामपंचायती अंतर्गत वाय-फाय नेटवर्क सेवा पुरविणे, सार्वजनिक वाचनालयांची उभारणी, मुलांसाठी पार्क, आठवडी बाजारात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, खेळाच्या मैदानासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, व्यायामाची साधने खरेदी करणे आदी कामांवर हा निधी खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले.