Grampanchayat Election : परभणी जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ११ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:25 PM2021-01-15T12:25:32+5:302021-01-15T12:31:19+5:30

जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला.

Grampanchayat Election: 11% voting in first two hours in Parbhani district | Grampanchayat Election : परभणी जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ११ टक्के मतदान

Grampanchayat Election : परभणी जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ११ टक्के मतदान

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासांमध्ये ११.२७ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले. 

सकाळच्या टप्प्यात मतदानाचा  वेग चांगला राहिला आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ७५ हजार ६९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३२ हजार ४८९ महिला आणि ४३ हजार २०० पुरुषांचे मतदान झाले  आहे.

Web Title: Grampanchayat Election: 11% voting in first two hours in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.