१२० शेतकऱ्यांचे ३१ लाखांचे अनुदान रखडले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:57+5:302020-12-07T04:11:57+5:30

खरेदी केलेल्या ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान मिळेना. देवगाव फाटा : कमी पाण्यात सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन ...

Grant of Rs 31 lakh to 120 farmers stalled ..! | १२० शेतकऱ्यांचे ३१ लाखांचे अनुदान रखडले..!

१२० शेतकऱ्यांचे ३१ लाखांचे अनुदान रखडले..!

Next

खरेदी केलेल्या ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान मिळेना.

देवगाव फाटा : कमी पाण्यात सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत अनुदान तत्त्वावर ठिबक व तुषार सिंचन योजना राबविण्यात येऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे; परंतु सेलू तालुक्यातील ५६६ पैकी १२० लाभार्थींचे ३१ लाखांचे अनुदान रखडले आहे.

निसर्गाचा असमतोल व पावसाचे घटणारे प्रर्जन्यमान व सिंचनाच्या अनुशेषाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून कोरडवाहू शेतीची बटई व ठोक्याने देण्याकडे वाटचाल सुरू आहे. कमी पाण्यात ठिबक व तुषार सिंचन योजनेअंतर्गत सेलू तालुक्यातील ५६६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करून ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी केले होते. त्याचा वापर शेतीत सुरू केला. कृषी विभागाने या उपक्रमात मोका तपासणी करून अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी ४४६ शेतकऱ्यांना ९९ लाख २५ हजार अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले परंतु उर्वरित १२० शेतकऱ्यांचे ठिबक व सिंचन संच अनुदानाचे ३१ लाख रुपये अद्यापही मिळाले नसल्याने हे शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात अनुदान दिले जाते. यामुळे सिंचन क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होत असली तरी अनुदान रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फरपट होत असल्याचे समोर आले आहे.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून या योजनेचे अनुदान उपलब्ध झाले नाही. आतापर्यंत शासनाकडे पाठपुरावा करून ५६६ पैकी ४४६ शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनचे अनुदान वितरित केले. उर्वरित १२० लाभार्थींनाही तातडीने अनुदान देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे आमचा पाठपुरावा चालू आहे.

आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलू.

अनुदानाची सरासरी ४५ ते ५५% .

या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के (१२ हजार ५००) तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के (९ हजार ८५५) तर ठिबक संचाकरिता कमीत कमी ७ हजार १३४ व जास्तीत जास्त २ लाख ९९ हजार ८५० रुपये या प्रमाणात अनुदान दिले जाते; परंतु ठिबक व तुषार सिंचनाकरिता शेतकऱ्यांना प्रथमतः मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते आणि अनुदानाची रक्कम वेळेत मिळत नसल्याने शेतकरी मात्र आणखीन अडचणीत येत आहेत. याकडेही शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

ठिबक व तुषार सिंचनचे एकूण लाभार्थी....५६६

अनुदान मिळालेले लाभार्थी ४४६

अनुदानापासून वंचित लाभार्थी १२०

Web Title: Grant of Rs 31 lakh to 120 farmers stalled ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.