परभणी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस; रबी पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 07:49 PM2020-03-31T19:49:52+5:302020-03-31T19:51:55+5:30
रबीच्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़
परभणी : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारी रात्री जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ यामुळे रबीच्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़
परभणी शहर व परिसरात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली़ जवळपास १० ते १५ मिनिटे पाऊस झाल्यानंतर हा पाऊस बंद झाला़ त्यानंतर रात्री ११ वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली़ रात्री जवळपास अडीच वाजेपर्यंत अधूनमधून वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता़ मध्यरात्री जवळपास ४ च्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला़ वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़ याशिवाय वादळी वाºयामुळे शहरातील विविध भागांमधील झाडे तुटून पडली होती़ तसेच कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृती संदर्भात लावण्यात आलेले शहरातील विविध भागांतील फलकही कोसळले़ महसूल विभागाकडे शहरात सोमवारी रात्री १२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे़ या शिवाय परभणी ग्रामीण महसूल मंडळात ११, सिंगणापूरमध्ये २७, दैठण्यात १०, झरीत १२, पेडगावमध्ये १०़६०, पिंगळीत १३ व जांबमध्ये १४ मिमी पाऊस झाला आहे़
पुर्णेत १७ मिमी पाऊस
पूर्णा : पूर्णा शहर व तालुक्यात सोमवारी रात्री ५ महसूल मंडळांत तब्बल १६़८० मिमी पाऊस झाला़ वादळी वारे व पावसामुळे आंब्याच्या कैºया गळून पडल्या़ तसेच गहू, ज्वारी, हळद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तालुक्यातील पूर्णा महसूल मंडळात २२, ताडकळस महसूल मंडळात २४ तर चुडावा, कात्नेश्वर महसूल मंडळात प्रत्येकी १२, लिमला मंडळात १४ असा एकूण सरासरी १६़८० मिमी पाऊस झाला़
परभणी जिल्ह्यात ८ मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सरासरी ८़४ मिमी पावसाची नोंद झाली़ त्यामध्ये परभणी तालुक्यात १३़७० मिमी, पालम तालुक्यात ०़३३ मिमी, पूर्णा तालुक्यात १६़८० मिमी, गंगाखेड तालुक्यात ५़५० मिमी, सोनपेठ तालुक्यात ११़५० मिमी, सेलू तालुक्यात ५़२० मिमी, पाथरी तालुक्यात ५ मिमी, जिंतूर तालुक्यात ५़६७ मिमी, मानवत तालुक्यात १०़६७ मिमी पाऊस झाला़