गुटखा माफियांना दणका ! गंगाखेडमध्ये येणारा ४५ लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 06:09 PM2021-11-04T18:09:03+5:302021-11-04T18:10:40+5:30

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Gutkha worth Rs 45 lakh seized in Gangakhed | गुटखा माफियांना दणका ! गंगाखेडमध्ये येणारा ४५ लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

गुटखा माफियांना दणका ! गंगाखेडमध्ये येणारा ४५ लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

Next

गंगाखेड (परभणी ) : परळी-गंगाखेड मार्गावरील वडगाव स्टेशन फाट्याजवळ अवैध गुटख्याची वाहतूक करणारा एक कंटेनर पोलिसांनी बुधवारी ( दि.३ ) सायंकाळी ६:३० वाजता ताब्यात घेतला. तपासणीत कंटेनरमधून ४४ लाख ७९ हजार रुपयांचा १२५ गोणी गुटखा जप्त करण्यात आहे. पोलीस अंमलदार विकास अशोकराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

गंगाखेड-परळी महामार्गावर बुधवारी मोटारसायकलवरून गुटख्याची गोणी गंगाखेडला घेऊन जाणाऱ्या नुरखान सालारखान पठाणला प्रथम पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा यांनी अधिक तपास केला तेव्हा एका कंटेनरमधून गंगाखेडकडे मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. 

पोलिसांनी सायंकाळी परळी रोडवर असलेल्या वडगाव स्टेशन फाट्याजवळ सापळा रचून एक कंटनेर (आर.जे.१४- जी.एच.६३०१ ) थांबवला. कंटेनरची तपासणी केली असता त्यात १२५ गोणी गुटखा आढळून आला. पोलिसांनी ४४ लाख ७९ हजार रुपयांचा गुटखा आणि १२ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण  ५६ लाख ७९ हजाराचा मुद्देमाला जप्त केला. या प्रकरणी हरियाणाचा रहिवासी तावेफ कालू शेख, परळी येथील अलताफ खान सरदार खान पठाण ( रा.मिलीद नगर ), शेख हैदर अली शेख लायक अली ( रा.युसूफ काॅलनी), शेख मुस्ताख शेख शबिर ( जुने रेल्वेस्टेशन) या आरोपींविरोधात पोलीस अंमलदार विकास अशोकराव जोंधळे यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gutkha worth Rs 45 lakh seized in Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.