सोनपेठ, पालममध्ये गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:39+5:302021-03-20T04:16:39+5:30
सोनपेठ तालुक्यातील उखळी, वडगाव, निळा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ७च्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर ...
सोनपेठ तालुक्यातील उखळी, वडगाव, निळा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ७च्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर गारपीट झाली. यामुळे रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सध्या काढणीला गहू व ज्वारी आली आहे. ही दोन्ही पिके भिजली आहेत. तसेच आंबा व टरबूज या पिकांचेही नुकसान झाले आहे. उखळी व वडगाव परिसरातील पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पालम तालुक्यातही शुक्रवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. तालुक्यातील पुयणी, पालम, आडगाव, वनभूजवाडी, तेजलापूर या गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली. अर्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कापणीस आलेले ज्वारी पीक भुईसपाट झाले. तसेच गहू, हरभरा पिकाची नासाडी झाली आहे. आंबा व इतर फळपिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे.