परभणी जिल्ह्यात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:09+5:302021-03-21T04:17:09+5:30

परभणी : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, गारपीटही झाली आहे. या पावसामुळे आंब्याच्या पिकासह ...

Hailstorm in Parbhani district | परभणी जिल्ह्यात गारपीट

परभणी जिल्ह्यात गारपीट

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, गारपीटही झाली आहे. या पावसामुळे आंब्याच्या पिकासह काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार २० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाथरी तालुक्यात हादगाव, खेर्डा, पाथरगव्हाण, मरडसगाव येथे सायंकाळी ६.३०च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मानवत शहर, तालुक्यातील रामपुरी बु., मंगरुळ बु., सारंगापूर, हटकरवाडी, जिंतूर तालुक्यातील येलदरी या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. मानवत तालुक्यातील रामपुरी, पाथरी तालुक्यातील लिंबा परिसरात गारपीट झाली. बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास परभणी शहर व परिसरातही मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या पावसामुळे आंब्याचे तसेच गहू, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Hailstorm in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.