उद्यानातील काम सोडले अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:01+5:302021-04-09T04:18:01+5:30
रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कायम परभणी : तालुक्यातील झरी येथील रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या ...
रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कायम
परभणी : तालुक्यातील झरी येथील रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरेानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध नियम करण्यात आले असले, तरी येथे या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.
गंगाखेड रस्त्यावर पुलाचे काम अर्धवट
गंगाखेड : गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील विविध ठिकाणच्या पुलांचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे रहदारी करताना वाहनधारकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शासन आदेशानंतरही दुकाने उघडीच
परभणी : अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच खासगी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. असे असताना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या समोरील बाजूस असलेली अनेक दुकाने गुरुवारी दुपारी चारपर्यंत उघडीच होती. विशेष म्हणजे या दुकानांत नागिरकांची वर्दळही होती.
‘रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवा’
परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रामंक ६१ लगत काही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. हे नागरिक आपल्या दुकानांतील साहित्य बाहेरील बाजूस ठेवत आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्यालगत झाडे लावण्यास टाळाटाळ
परभणी : परभणी ते जिंतूर या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असताना या रस्त्याच्या बाजूला संबंधित कंत्राटदाराकडून अद्यापही झाडे लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.