बसस्थानकासमोर हातगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:50+5:302021-01-22T04:16:50+5:30
गौर येथे ज्ञानेश्वरी पारायण, सप्ताह गौर : पूर्णा तालुक्यातील गौर येथे १३ ते २० जानेवारी या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी ...
गौर येथे ज्ञानेश्वरी पारायण, सप्ताह
गौर : पूर्णा तालुक्यातील गौर येथे १३ ते २० जानेवारी या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. बालासाहेब महाराज भाटेगावकर व भिकाजी महाराज मोगले यांनी केले. यावेळी बंडू महाराज गिरी, सटवाजी महाराज सुहागन, राम महाराज खोरसकर, पांढरीकर महाराज, दीपक गुरू महाराज यांचे कीर्तन झाले.
नवनिर्वाचित सदस्यांचा आलेगाव येथे सत्कार
आलेगाव : पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या सदस्यांचा त्रिरत्न बुद्ध विहार येथे सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव घाटूळ, साहेबराव गजभारे, सुदाम धुमाळे, रूपेश सोनटक्के, गोपीनाथ सवराते, बद्रीनाथ सवराते, माणिकराव सवराते आदी उपस्थित होते.
ग्रा.पं. निवडणूक निकालाची चर्चा संपेना
सेलू : ग्रामपंचायतीचा निकाल लागून दोन दिवस उलटून गेले तरी गावागावात जय- पराजयाच्या चर्चा झडत आहेत. काही ठिकाणी अद्यापही रुसवे फुगवे सुरू आहेत. पराभव पत्कारलेल्या उमेदवारांकडून अद्यापही आकडेमोड चालूच आहे.
अटीतटीतील विजयी उमेदवार सहलीवर
सेलू : ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काठावर बहुमत आहे. त्या गावातील पॅनल प्रमुखाने सदस्य फुटू नयेत म्हणून सहलीवर पाठवले आहेत. त्यामुळे नव नवनिर्वाचित सदस्यांची मौज सुरू आहे. येत्या काही दिवसांतच आरक्षण जाहीर होणार आहे.
रेणापूर येथे वित्तीय साक्षरता शिबिर
पाथरी : तालुक्यातील रेणापूर येथे भारतीय स्टेट बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वित्तीय साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सभापती दादासाहेब टेंगसे, गटविकास अधिकारी कोरेगावकर, मंगेश नवसाळकर, हट्टेकर, जंगम, नेमाणे, शाखा व्यवस्थापक जोशी, भवर, कुणाल, ग्रामसेवक संदीपान घुंबरे आदी उपस्थित होते.
संयोजन समितीकडून मैदानाची पाहणी
सेलू : शहरातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पालिकेने २४ जानेवारी रोजी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. बुधवारी नगराध्यक्ष विनोद बोराडे उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे व संयोजन समितीने मैदानाची पाहणी केली.
सेलू मोंढ्यात वाहतुकीची कोंडी
सेलू : शहरातील मोंढ्यातील रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने ये- जा करण्यासाठी वाहतुकीची कोंडी होत असून पादचाऱ्यांना वाहनाचा धक्का लागत आहे. या कारणावरून अनेक वेळा कुरबुरीच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाणातून शैक्षिणक साहित्याचे वाटप
ताडकळस : येथील डॉ. अरुणा डोंबे व डॉ. विष्णू डोंबे यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त वाणातून शैक्षिणक साहित्याचे वाटप करण्यात आले. क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठीचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचाच आदर्श समोर ठेवून मकर संक्रांतीनिमित्त डोंबे कुटुंबियांनी २० जानेवारी रोजी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप करून महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
आसोला येथे निधी संकलन मोहीम
आसोला : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माणासाठी असोला येथे नुकतीच निधी संकलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी निधी समर्पण अभियानाचे नेतृत्व ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी केले. यानिमित्त गावात दिंडी काढण्यात आली होती.
रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम
आसोला : येथे नुकतेच राज्य महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरटीओ श्रीकृष्ण नखाते यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कुकडे, वसंतराव मुळे आदी उपस्थित होते.