मळणी यंत्रात रुमाल अडकल्याने बसला गळफास; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:27 PM2023-10-18T18:27:56+5:302023-10-18T18:28:11+5:30

शेतात सुरू होती सोयाबीन काढणी

handkerchief getting stuck in the threshing machine; The farmer died on the spot | मळणी यंत्रात रुमाल अडकल्याने बसला गळफास; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू 

मळणी यंत्रात रुमाल अडकल्याने बसला गळफास; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू 

सोनपेठ : तालुक्यातील नैकोटा येथे सोयाबीनची काढणी चालू असतानाच मळणी यंत्रात गळ्यातील रुमाल अडकून गळफास बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.बालासाहेब साठे असे मृत शेतकाऱ्याचे नाव आहे.

शेतकरी बालासाहेब साठे सकाळी सोनपेठ येथून त्यांच्या नेकोटा येथील शेतात आले.शेतात हारवेस्टरद्वारे सोयाबीन काढणी सुरू होती. यावेळी हारवेस्टरवर चढून साठे पाहणी करत होते. अचानक गळ्यातील रुमाल हारवेस्टरच्या पंख्यात अडकल्याने साठे यांचा गळा आवळला गेला. यावेळी चालकाचेही लक्ष गेले नाही. दरम्यान, काही कळायच्या आत साठे बेशुध्द अवस्थेत हारवेस्टरवरती पडलेले दिसले. त्यांना तत्काळ गंगाखेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: handkerchief getting stuck in the threshing machine; The farmer died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.