अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशी द्या, सेलूकर एकवटले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:00 PM2022-09-08T15:00:15+5:302022-09-08T15:03:48+5:30

शहरात बंदला प्रतिसाद, मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला 

Hang 'those' murderers who raped a minor girl, Selukar unites | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशी द्या, सेलूकर एकवटले 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशी द्या, सेलूकर एकवटले 

Next

सेलू (परभणी) : अल्पवयीन मुलीसह तिचा मावस भावाला दुचाकीवरून पळून नेऊन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सेलूकरांनी तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन दिले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची वार्ता पसरताच शहरातील नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेअकरा वाजता शहरातील क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आरोपींना फाशी झालीच पाहिजे या प्रमुख मागणी असलेले फलक हातात घेऊन महिला व मुलींनी घोषणाबाजी करत मुख्य रस्त्यावरून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. अशा घटना रोखण्यासाठी त्या नराधमांना फाशीची शिक्षा करा, अशी मागणी तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देऊन करण्यात आली. मोर्चात विविध पक्षाचे संघटनेचे  पदाधिकारी यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा
या घटनेमुळे दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबावर मोठा अघात झाला आहे. समाजातील अशा अपप्रवृत्तीना कायमचा धडा शिकवण्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहीजे. अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.  मुलीवर अत्याचार करणा-या दोन्ही आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी  करत  घोषणांनी मोर्चा-यांनी शहर दणाणून सोडले. 

काय आहे प्रकरण
शहरातील १० वर्षीय मुलगी व तिचा मावस भाऊ हे सोमवारी सेलू- देवगाव रस्त्यावर उभे होते. दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून वालूर मार्ग कौसडीकडे नेले. तिच्या मावस भावास कौसडी येथील रस्त्यावर सोडून देऊन मुलीला कोक शिवारात नेऊन अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस यंञणेची झोप उडाली होती. पोलीस अधीक्षक जयंत मीना अप्पर पोलीस अधीक्षक मुक्कमा सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक अविनाश कुमार आदी वरिष्ठ अधिकारी यांनी सेलू पोलीस ठाणे गाठून तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्हीतील फुटेच्या माध्यमातून बुधवारी पोलीसांनी राजेगाव शिवारातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Hang 'those' murderers who raped a minor girl, Selukar unites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.