आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल
By मारोती जुंबडे | Published: September 8, 2023 11:57 AM2023-09-08T11:57:55+5:302023-09-08T11:58:25+5:30
६४ मिलिमीटर पावसाचे नोद; सलग पाचव्यांदा धरण भरणार का?
येलदरी वसाहत: एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत साडेतीन दलघमीची वाढ झाली असून २४ तासात धरण परिसरात ६४ मिलीमीटर पावसाची नोंद येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाच्या कालखंडात सलग पाचव्यांदा येलदरी धरण भरेल अशी आशा निर्माण झाली आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हे पिके पाण्याअभावी करपून जात होती त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते यावर्षी थंड स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये 50% उत्पादनाची घट होणार असल्याचे दिसून येत आहे त्यातच पिकांवर केलेला खर्चही उत्पादन उत्पन्नातून निघतो की नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना लागले आहे.
गतवर्षी येलदरी धरण ९ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. आजपर्यंत येलदरी धरणात ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून धरण क्षेत्रात गुरुवारपासून चांगला पाऊस होत आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या रिमझिम पावसामुळे काही अंशी खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात मोठी घट होणार आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत साडेतीन दलघमीची वाढ झाली असून २४ तासात धरण परिसरात ६४ मिलीमीटर पावसाची नोंद येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाच्या कालखंडात सलग पाचव्यांदा येलदरी धरण भरेल अशी आशा निर्माण झाली आहे.
प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता (दलघमी)
1) मृत पाणीसाठा - १२४.६७०
2) जिवंत पाणीसाठा - ८०९.७७०
3) एकूण पाणीसाठा - ९३४.४४०
-------------------------------------
८ सप्टेंबर रोजीचा पाणीसाठा तपशील(दलघमी)
1) मृतसाठा - १२४.६७०
2) जिवंतसाठा - ४८८.२७९
3) एकूण साठा - ६२१.९३९
4) पाणीपातळी - ४५८.३२० मी.
5) मागील 24 ता. आवक - ३.३३४ दलघमी
6) टक्केवारी जिवंतसाठ्याची - ६०.२९ %
7) आजचा पाऊस/यावर्षी एकूण - ६४/५११ मिमी
8) विद्युत निर्मिती केंद्रद्वार विसर्ग - ००
9) मुख्य द्वार विसर्ग - ००