परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:23 AM2018-10-10T00:23:38+5:302018-10-10T00:24:21+5:30

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़

Harmful farmers in Parbhani district: Low power supply in Palam | परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़
पालम तालुक्यात सहा ३३ केव्ही उपकेंद्रातून गावठाण व शेतातील कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो़ सहा उपकेंद्रांना गंगाखेड येथून केवळ एका वीज वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात असल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़
क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी होत असल्याने तसेच गंगाखेड येथून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने महावितरणच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे़ आठ दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध असूनही विजेच्या कमी दाबामुळे कृषीपंप चालत नाहीत़
केरवाडी फिडरला : सर्वाधिक फटका
केरवाडी फिडरमधून १८ गावांना वीज पुरवठा केला जातो़ दोन विभागात गावे विभागूनही पुरवठा सुरळीत होत नाही़ जुनाट यंत्रणा असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होतात़ गोदाकाठची गावे व कृषीपंपांचा मोठा भार असल्याने या फिडरवरील गावांना नेहमीच वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होत असलयाने फटका सहन करावा लागत आहे़
पालम तालुक्यात ग्रामीण भागात विविध फीडरचे लाईनमनच्या मदतीने दोन भाग करून वीज पुरवठा केला जात आहे. पालमच्या केंद्रात २०० एम्पीयरपर्यंत लोड सहन करणारी यंत्रणा आहे. पण फीडर चालू करताच हा भार २३० ते २४० पर्यत जात आहे. त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.
-व्ही. डी. स्वामी, उपकार्यकारी अभियंता, पालम

Web Title: Harmful farmers in Parbhani district: Low power supply in Palam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.