परभणी शहरात अर्धा तास वृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:32 AM2018-06-11T00:32:38+5:302018-06-11T00:32:38+5:30
तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़
शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर रविवारी मात्र दिवसभर पावसाने विश्रांती घेतली़ त्यामुळे पावसाचा खंड पडण्याची चिन्हे असतानाच सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला़ पाथरी, मानवत तालुक्यामध्ये जोराचे वारे वाहत होते़ ढगाळ वातावरणही निर्माण झाले़ मात्र पावसाने हजेरी लावली नाही़ परभणी शहरात सायंकाळी ५ वाजेपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले़ काळेकुट्ट ढग जमा झाले़ सोसायट्याचा वाराही सुटला होता़ रात्री ८ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला़ विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शहरात पाणीच पाणी झाले़ अर्धा तास हा पाऊस होता़ त्यानंतर पावसाचा वेग कमी झाला़ परंतु, भूरभूर पाऊस सुरूच राहिला़ या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़