हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:23 AM2021-08-18T04:23:26+5:302021-08-18T04:23:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील निम्म्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. मात्र निम्मे कर्मचारी अजूनही लसीकरणाची प्रतीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील निम्म्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. मात्र निम्मे कर्मचारी अजूनही लसीकरणाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांच्या लसीकरणाचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी शक्यतो युवक वर्गात मोडतात. जिल्ह्यात युवकांसाठीच्या लसीकरणाला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या साधारणत: निम्म्या कर्मचाऱ्यांचा एक-एक डोस घेऊन झाला आहे. मात्र पुढील डोस रखडला आहे. हॉटेल्स सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी लस घेतली की नाही, याची खात्री करून घेणारी यंत्रणाच उपलब्ध नाही, त्यामुळे सर्व काही आलबेल आहे.
हॉटेल १
कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आहे. एक डोस बाकी आहे. दुसऱ्या डोसची तारीख आणखी आली नसल्याने लस घेता आली नाही. लसीकरण करून घेणार आहे.
हॉटेल २
लसीकरण करून घ्यायचे आहे. मात्र लसच मिळत नाही. मध्यंतरी आठ-आठ दिवस केंद्र बंद होते. त्यामुळे इच्छा असूनही लस घेता आली नाही. एक-दोन दिवसांत घेणार आहे.
बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले
मोठ्या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस पेंडिंग आहे. त्यांची तारीख आली की त्यांनाही लस घेणे बंधनकारक केले आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले जाणार आहे.
- जितेंद्र खैराजानी, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन
रस्त्यांवर टपऱ्यांवर आनंदीआनंद
n मोठ्या हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांनी किमान लसीचा एक डोस घेतला आहे.
n मात्र चहा, नाश्त्याच्या हाॅटेल्समधील अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले नाही.
n या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उदासिनता दाखविली.
n तेव्हा छोट्या हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.