२६१ रुग्णांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:42+5:302021-02-16T04:18:42+5:30
येथील सवंगडी कट्टा समूहाने १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तालुक्यातील २६१ रुग्णांची थॉयराईड, टूडी ...
येथील सवंगडी कट्टा समूहाने १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तालुक्यातील २६१ रुग्णांची थॉयराईड, टूडी युको व रक्तातील विविध नमुन्यांची तपासणी द्वारका फंक्शन हॉल येथे आयोजित मोफत शिबिरात करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, डॉ. गोविंद रसाळ, नारायण सेवा संस्थानच्या अध्यक्षा मंजुताई दर्डा, डॉ. स्वाती मुंडे, डॉ. पी. आर. चट्टे, डॉ. के.पी. गारोळे, डॉ. केशव मुंडे, डॉ. दिपेंद्र अळनुरे, सरपंच आशाताई चोरघडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात हृदय रोगाशी संबंधित आजारासाठी टू डी इकोच्या माध्यमातून ह्रदयाच्या सर्व तपासण्या, मधुमेह, थायराईडसह रक्तातील अन्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. यात टू डी इको ९४, थायराईड ९० व मधुमेह संबंधिच्या ७७ अशा एकूण २६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, गोपी मुंडे, कारभारी नीरस, प्रा. डॉ. मुंजाजी चोरघडे, गजानन महाजन, डॉ. पारस जैन, डॉ. योगेश मल्लुरवार, प्रवीण जायभाये, राजकुमार फड, लक्ष्मीकांत नाव्हेकर, प्रशांत शिंदे, विशाल देशमुख, अतुल तुपकर, दिलीप सोळंके, नंदकुमार सोमाणी, शेख खाजा, हरिभाऊ सावरे, केशव देशमुख, अक्षय जैन, योगीराज सावरे, सुहास पाठक, संतोष मुंडे, डॉ. सचिन सुपेकर, डॉ. फेरोज शेख, कृष्णा तापडिया आदींनी परिश्रम घेतले.