दोन गटांत वादातून जोरदार हाणामारी, नऊ जणांविरुद्ध गुन्हा

By ज्ञानेश्वर भाले | Published: June 10, 2023 06:23 PM2023-06-10T18:23:45+5:302023-06-10T18:23:57+5:30

या प्रकरणी परस्परांच्या तक्रारीवरून दोन्ही गटांतील नऊ जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Heavy clash between two groups due to dispute, crime against nine people | दोन गटांत वादातून जोरदार हाणामारी, नऊ जणांविरुद्ध गुन्हा

दोन गटांत वादातून जोरदार हाणामारी, नऊ जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

मानवत (जि.परभणी) : तालुक्यातील रुढीत दोन गटांत वाद झाल्याने एकमेकांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी परस्परांच्या तक्रारीवरून दोन्ही गटांतील नऊ जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूढी येथील गोविंद पांडुरंग होंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ६ जूनला सायंकाळी मित्र धुराजी वचिष्ठ होंडे आणि गावातील संकेत होंडे यांचा वाद मिटविण्यासाठी गावातील मंदिराजवळ गेलो असता भागवत पांडुरंग होंडे, पुष्पा भागवत होंडे, संकेत भागवत होंडे आणि पिंपळगाव येथील दोन पाहुण्यांनी धुराजी होंडे याला संकेत सोबत वाद का घालतो असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी संकेत होंडे याने हातातील चाकूने माझ्या पोटाच्या उजव्या बाजूस मारून जखमी केले. गोविंद होंडे यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर पुष्पा भागवत होंडे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, घरातील लाईट गेल्यामुळे पती सोबत दारात बसलेली असताना गावातील सहा जण दारासमोरून शिवीगाळ करुन शिट्ट्या वाजवत जात होते. शिवीगाळ व शिट्ट्या का वाजवता असे विचारले असता गावातील गोविंद पांडुरंग होंडे, रामप्रसाद उद्धव होंडे, दत्ता प्रकाश होंडे, प्रकाश रामभाऊ होंडे, गौरव गजानन होंडे, धुराजी वचिष्ठ होंडे यांनी पती-पत्नीला लाथाबुक्क्याने मारहाण करून आमच्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिल्यास तुमच्या कुटुंबातील सर्वांना जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. पुष्पा भागवत होंडे यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Heavy clash between two groups due to dispute, crime against nine people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.