जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही संततधार वृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:18+5:302021-06-11T04:13:18+5:30
चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. या पावसामुळे ओढ्या, नाल्यांना पूर आला असून, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्यात गुरुवारी ...
चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. या पावसामुळे ओढ्या, नाल्यांना पूर आला असून, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारासही सर्वदूर पावसाने हजेरी लावली. परभणी शहर आणि परिसरात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्री आठवाजेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २४.२ मिमी पाऊस पाऊस झाला आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळामध्ये ७१.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्याचप्रमाणे परभणी मंडळांमध्ये ५५ मिमी, पाथरी तालुक्यातील बाभूळगाव मंडळात ४६.८ मिमी, मानवत तालुक्यातील केकरजवळा मंडळात ४६.५ मिमी असा सर्वाधिक पाऊस झाला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत आहे.