परभणी जिल्ह्यातील चिकलठाणा मंडळात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:07 PM2020-07-10T12:07:57+5:302020-07-10T12:09:46+5:30
चिकलठाणा, वालूर आणि देऊळगाव मंडळात जोरदार पाऊस पडला आहे.
सेलू: तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळाला सलग दुस-या दिवशीही अतिवृष्टीचा तडाखा बसला. गुरूवारी तब्बल १४३ मीमी पाऊस झाल्याने सखल भागातील पिकात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे.
गुरुवार सांयकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. सेलू आणि कुपटा परिसरात ब-या पैकी पावसाचा जोर होता. मात्र चिकलठाणा, वालूर आणि देऊळगाव मंडळात जोरदार पाऊस पडला आहे. गुरूवारी सेलू मंडळात २७ मीमी, देऊळगाव ५४मीमी, कुपटा २६मीमी, वालूर ४७मीमी, तर चिकलठाणा मंडळात तब्बल १४३ मीमी पाऊस पडला आहे.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
चिकलठाणा महसूल मंडळात बुधवारी रात्री जोरदार पाऊस पडला होता. त्या दिवशी ७० मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गुरूवारी पुन्हा मुसळधार पाऊस कोसळला. काही तासातच १४३ मीमी एवढा पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकरी चिंतेत आहेत. रायपूर येथील ओढ्याला पुर येऊन पाणी शेतात घुसले आहे.त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि मुग ही पिके पाण्यात गेली आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली आहे.