अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:19 AM2021-09-18T04:19:50+5:302021-09-18T04:19:50+5:30
पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी पूर्णा, पालम, गंगाखेड आणि सोनपेठ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बाधित ...
पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी पूर्णा, पालम, गंगाखेड आणि सोनपेठ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बाधित शेतकऱ्यांना धीर देत मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले. या दौऱ्यात आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळी पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकरी शोभा रुस्तुम मोरे, माटेगाव येथील शेतकरी सोपान मारोतीराव बोबडे यांच्या शेतातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पालम तालुक्यातील जवळा येथील रावसाहेब नागोराव खटिंग यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. तसेच गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी लक्ष्मण किशनराव दणदणे यांच्या शेतातील अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन आणि कापूस पिकांची तर मरडसगाव येथील शेतकरी त्रिंबक काळे यांच्या शेतातील पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रल्हाद मुरकुटे, मरडसगावचे सरपंच विक्रम काळे, भाजपाचे कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंढे, मनसेचे बालाजी मुंढे, माधव भोसले, श्रीकांत भोसले यांची उपस्थिती होती. तसेच सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव येथील शेतकरी अकुंश मारोतराव कदम यांच्या शेतातील कापूस पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांना धीर देत शासनाकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, दशरथ सुर्यवंशी, चंद्रकांत राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, विठ्ठलराव सुर्यवंशी, तहसीलदार ऐश्वर्या गिरी, तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांची उपस्थिती होती.