परभणी जिल्ह्यात शेतीच्या वादातून मारहाण; सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:38 AM2018-01-06T00:38:17+5:302018-01-06T00:38:22+5:30
शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे़
गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळील शेत सर्वे नं़ २३० मधील शेतीची २२ डिसेंबर २०१७ रोजी मोजणी करण्यात आली होती़ ५ जानेवारी रोजी भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक अधिकारी एस़पी़ लाटे, साळवे, पोलीस कर्मचारी मुक्तार पठाण, खंडेराय राऊत या कर्मचाºयांनी येथील नारायणराव यादव यांच्या शेतीची हद्द निश्चित करून दिली़ यानंतर भूमापक अधिकारी व पोलीस कर्मचारी शेतातून निघून गेल्यानंतर दुपारी १२़३० ते १ वाजेच्या सुमारास नारायणराव यादव यांच्या भावकीतील काही जणांनी शेतात येऊन ज्ञानोबा यादव (४०), बाळू यादव (२८), किशनराव गिराम (५८), भागीरथीबाई गिराम (४५, सर्व रा़ गंगाखेड) , बालाजी आमले (५५), सरस्वतीबाई आमले (४५), दीपक आमले (२६, रा़ किनगाव ता़ अहमदपूर) यांच्यावर भुरकी मिरची टाकून लोखंडी गज व कुºहाडने मारहाण करून जखमी केले़ या सर्व जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़
यातील बालाजी आमले व भगीरथीबाई गिराम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे़ या प्रकरणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़