परभणीत होळीची तयारी; गायीच्या शेणाची गवरी अन् रंगही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:35 AM2018-02-28T00:35:39+5:302018-02-28T00:35:46+5:30

होळीच्या सणासाठी गायीच्या शेणांपासून बनविलेल्या गवºया आणि धुलीवंदनासाठी गोमुत्रापासून बनविलेला पर्यावरणपूरक रंग परभणीत उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी यावर्षीच्या होळी सणाचे वैशिष्ट्य ठरल्या आहेत.

Holi preparation for Parbhani Holi; Cows cow's garry and color ..! | परभणीत होळीची तयारी; गायीच्या शेणाची गवरी अन् रंगही..!

परभणीत होळीची तयारी; गायीच्या शेणाची गवरी अन् रंगही..!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : होळीच्या सणासाठी गायीच्या शेणांपासून बनविलेल्या गवºया आणि धुलीवंदनासाठी गोमुत्रापासून बनविलेला पर्यावरणपूरक रंग परभणीत उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी यावर्षीच्या होळी सणाचे वैशिष्ट्य ठरल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात काही युवकांनी पुढाकार घेत गोशाळा सुरू केल्या आहेत. गायीचे शेण आणि गोमुत्राला वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असल्याने यापासून दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची निर्मिती या गोसेवकांनी केली आहे. मानवत तालुक्यातील रामेटाकळी, मानवत, परभणी तालुक्यातील वांगी, झरी, जिंतूर तालुक्यातील इटोली आदी ठिकाणी गोशाळा आहेत.
या गोशाळा चालविणाºया युवकांनी एकत्र येत गायीचे शेण आणि गोमुत्रापासून साबण, उदबत्ती, स्प्रे, पूजेसाठी लागणारे धूप, शेण खत आणि डिकंपोजर आदी वस्तूंची निर्मिती केली आहे. सध्या जिल्ह्यात होळी सणाची धामधूम सुरू आहे. होळी सणाच्या दिवशी लाकडे आणि गवºया पेटवून होळी साजरी केली जाते तर धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण करीत हा सण साजरा केला जातो. ‘दान नको, अनुदान नको’ या तत्त्वावर ही कामे केली जात आहेत. ताडबोरगाव येथील राजेंद्र बिर्ला यांनी दिवसभर जळणारी गवरी तयार केली आहे.
यासाठी परभणी येथील पेडा हनुमान संस्थानचे श्रीरामजी तिवारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. वांगी येथील डॉ.राजेश चौधरी, झरी येथील पद्माकर चव्हाण, महेश सोनी, माणिक रासवे, सुशिल शर्मा आदींनी या कामी पुढाकार घेतला.
शेणखतापासून लाकूड बनविण्याचा संकल्प
महेश सोनी यांनी सांगितले, नागपूर येथील गोविज्ञान संशोधन केंद्रात गायीच्या शेण आणि गोमुत्रापासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शेण, शेतातील काडीकचरा आणि गोमुत्रापासून लाकूड तयार करण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आले आहे. लाकडे जाळल्याने कार्बन डाय आॅक्साईडची निर्मिती होते. तर अशा पद्धतीने लाकूड तयार झाल्यास जास्तीत जास्त आॅक्सीजन तयार होईल. शिवाय झाडांची कत्तलही थांबेल. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेले अशा पद्धतीने लाकूडन बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
गोमुत्रापासून बनविला रंग
इटोली येथील महेश स्वामी हे देखील गोसेवेचे कार्य करतात. यावर्षी त्यांनी गोमुत्रापासून पर्यावरणपूरक रंग तयार केला आहे. गायी ज्या गोठ्यात बांधतात त्या ठिकाणी शेणखत आणि काडी कचरा तयार होतो. गायींच्या पायदळी तुडविलेल्या खताला गोखुर खत असे म्हणतात. या गोखुर खताची चाळणी करुन मिळालेल्या बारीक भुकटी आणि गोमुत्राचा वापर करुन हा रंग बनविला आहे. विशेष म्हणजे, रंग तयार करण्यासाठी ‘फूड कलर’ वापरण्यात आल्याने या रंगाचा वापर करताना तो तोंडात गेला तरी साईड इफेक्ट होणार नाहीत. स्वामी यांनी या रंगाबरोबरच ऊदबत्ती आणि इतर वस्तूही बनविल्या आहेत.

Web Title: Holi preparation for Parbhani Holi; Cows cow's garry and color ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.