वाहनावरील कर्णकर्कश हाॅर्नचा आवाज थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:03+5:302021-03-04T04:31:03+5:30
दुचाकी चोर सक्रिय देवगाव फाटा : सेलू शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असून चोरट्यांनी चोरून नेलेल्या अनेक दुचाकीचा शोध ...
दुचाकी चोर सक्रिय
देवगाव फाटा : सेलू शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असून चोरट्यांनी चोरून नेलेल्या अनेक दुचाकीचा शोध लागला नाही. त्यामुळे दुचाकी मालकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरचा तपास करणे व दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मास्कचा नागरिकांना पडतोय विसर
देवगाव फाटा : कोरोनामुळे जवळपास आठ महिने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता हे जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मात्र दुसरीकडे कोरोनासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून वापरात येणारे मास्क आत्ता अनेक नागरिक घालताना दिसत नाहीत. त्यामुळे मास्कचा आत्ता विसर पडत असून ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.
वृक्षतोडीवर बंधन घालण्याची आवश्यकता
देवगाव फाटा : वन विभागाच्या वतीने वृक्ष न तोडण्याबाबत जनजागृती होत नसून या विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन हे तोडलेले वृक्ष ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहेत. याकडे वनविभाग मात्र लक्ष देत नाही. अथवा कारवाई करीत नाहीत. त्यामुळे पर्यावरणास एकप्रकारे हानी पोहाेचत आहे.