परभणीत ३२ पोलीस कर्मचाºयांचा केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:01 AM2018-01-29T00:01:13+5:302018-01-29T00:01:40+5:30

पोलीस दलात विशेष कामगिरी बजावणाºया ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

In honor of 32 police personnel in Parbhani, honor has been done | परभणीत ३२ पोलीस कर्मचाºयांचा केला सन्मान

परभणीत ३२ पोलीस कर्मचाºयांचा केला सन्मान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस दलात विशेष कामगिरी बजावणाºया ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा स्टेडियम मैदानावर पार पडलेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस कर्मचाºयांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील नानलपेठ भागातून अभिषेक दावलबाजे या १२ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाले होते. या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या दोन पथकांनी संयुक्त कामगिरी करीत अवघ्या २४ तासांत जिलानी खाजा सिकलकर आणि कलीम शाहनू सिकलकर या दोन आरोपींना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मोठ्या शिताफीने अटक केली आणि अपहृत विद्यार्थ्याचीही सुटका केली होती. ही कामगिरी करणारे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, उपनिरीक्षक नागनाथ सनगले, सचिन द्रोणाचार्य, प्रकाश कापुरे, चंद्रकांत टाकरस, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, सुरेश टाकरस, विठ्ठल कटारे, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, किरण भूमकर, मुकेश बुधवंत, निलेश भूजबळ, अजहर शेख, राजेश आगाशे, सय्यद उमर सय्यद अमीन, नारायण घुगे, अरुण कांबळे या पोलीस कर्मचाºयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या सात आणि औरंगाबाद, जालना व इतर ठिकाणाहून चोरलेल्या चार अशा ११ मोटारसायकली जप्त करुन मोटारसायकलचोरांना जेरबंद करण्याची कामगिरी जानेवारी महिन्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी केली होती. पोलीस निरीक्षक संजय हिबारे व सहाय्यक निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावणाºया मधुकर शंकरराव पवार, शिवदास धुळगुंडे, शाम काळे, शरद मुलगीर, किशोर चव्हाण, गणेश कौटकर, यशवंत वाघमारे या पोलीस कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच सर्वाधिक वॉरंट बजावल्याबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद मोईन, पोलीस नाईक एम.आर.बेग, अशोक वाकळे, मधुकर चट्टे, रामा कदम यांचा देखील पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: In honor of 32 police personnel in Parbhani, honor has been done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.