जिल्ह्यात घरकुलांची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:16+5:302020-12-09T04:13:16+5:30
चौकांच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष परभणी : येथील जुना मोंढा भागातील चौकाची दुरवस्था झाली आहे. या भागात काही दिवसांपूर्वीच रस्त्याचे ...
चौकांच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष
परभणी : येथील जुना मोंढा भागातील चौकाची दुरवस्था झाली आहे. या भागात काही दिवसांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वाढली आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी चौकांच्या दुररुस्तीकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरात उड्डाणपूल, गव्हाणे चौक या भागात चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे जुन्या मोंढ्यातील चौकाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
प्रशासकीय इमारतीत
बगीचा पडला ओसाड
परभणी : शहरातील प्रशासकीय इमारतीतील बगीचाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी बगीचा निर्माण केला, तेव्हापासून नवीन झाडे लावली नाहीत. त्याचप्रमाणे या परिसराची स्वच्छताही ठेवली जात नाही. त्यामुळे या बगीचाला सध्या बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. बगीचा निर्माण करण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे.
बसस्थानकातील सीसीटीव्ही बंद
परभणी : शहरातील बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या हे बसस्थानक तात्पुरत्या जागेत चालविले जात आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र या कॅमेऱ्याला कुठेही जोडणी दिली नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहेत. परिणामी प्रवाशांची सुरक्षा सध्या तरी वाऱ्यावर आहे.
जमीन हस्तांतरणाचा प्रश्न रखडला
परभणी : शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या ठप्प पडली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बाह्य वळण रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या नावासह मावेजाची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मावेजा वितरित केला नाही. त्यामुळे हस्तांतरणाची
प्रक्रिया ठप्प पडली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जमीन शासनाकडे हस्तांतरित होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
वाळूच्या लिलाव प्रक्रियेची प्रतीक्षा
परभणी : जिल्ह्यात २२ वाळू घाटांचे लिलाव करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच वाळू घाटांचे लिलाव होऊन सर्वसामान्य नागरिकांना मुबलक दरात वाळू उपलब्ध होणार आहे. सध्या वाळूचे भाव गगनाला भिडले असून, वाळू घाटाचे लिलाव कधी होतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.