वर्षारंभापासूनच माणुसकीची भिंत उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:29+5:302021-01-02T04:14:29+5:30
गंगाखेड : भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टने नवीन वर्षापासून ‘नको असेल ते द्या, गरजूंनी हवे असेल ते घेऊन जा’ ...
गंगाखेड : भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टने नवीन वर्षापासून ‘नको असेल ते द्या, गरजूंनी हवे असेल ते घेऊन जा’ हा माणुसकीच्या भिंतीचा उपक्रम दिनांक १ जानेवारीपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या अडगळीत टाकून दिल्या जातात. यामध्ये वापरात असलेल्या पण वापर करत नसलेल्या अनेक वस्तू घरातच ठेवल्या जातात. नागरिक शर्ट, पॅन्ट, साड्या, लहान मुलांचे कपडे, ब्लँकेट, स्वेटर्स, भांडी, इलेक्ट्रिकल वस्तू, चष्मा, घड्याळ, पुस्तके, कोऱ्या वह्या, जुनी सायकल आदी वस्तू या उपक्रमात दान करू शकतात. या वस्तू कांकरिया धर्मशाळा, पंचमुखी मारुती मंदिर, गोदातट येथे नागरिकांनी आणून ठेवाव्यात. गरजू, गरीब लोकांनी हव्या त्या वस्तू मोफत घेऊन जाव्यात, असा हा माणुसकीची भिंत उपक्रम असून, ताे नवीन वर्षापासून सुरु केला जाणार आहे, अशी माहिती मंजू दर्डा यांनी दिली.
दरम्यान, या उपक्रमामुळे अनेक गरजू व्यक्तींना मोफत साहित्य मिळणार असल्याने त्याचे गंगाखेडवासियांमधून स्वागत होत आहे.