गावपुढाऱ्यांत आली नम्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:36+5:302020-12-26T04:13:36+5:30

तासिका तत्वावरील प्राध्यापक संकटात देवगांवफाटा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ८ महिने महाविद्यालय बंद होती.२ डिसेंबर पासून महाविद्यालयास परवानगी दिली असली ...

Humility came to the village leaders | गावपुढाऱ्यांत आली नम्रता

गावपुढाऱ्यांत आली नम्रता

Next

तासिका तत्वावरील प्राध्यापक संकटात

देवगांवफाटा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ८ महिने महाविद्यालय बंद होती.२ डिसेंबर पासून महाविद्यालयास परवानगी दिली असली तरी अत्यल्प विद्यार्थी उपस्थितीमुळे तासिका तत्वावरील प्राध्यापक मंडळी संकटात आहेत.त्यामुळे बंद कालावधीचे किमान वेतन लागू करावे अशी मागणी होत आहे.

शाळा उघडल्या विद्यार्थी मात्र घरीच

देवगांवफाटा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनाने ९ वी ते १२ वी साठी शाळा उघडल्या आहेत. मात्र दुसरीकडे कोराेना धास्तीने काळजी करणारे पालक मात्र पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे शाळा उघडल्या मात्र विद्यार्थी घरी असे चित्र दिसून येत आहे.

वाहनांना रिफ्लेक्टर बसवावेत

देवगांवफाटा- वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अपघाताच्या घटना बहुतांश रात्री घडत असून वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्री समोरच्या वाहनाचा अंदाज चालकांना येत नसल्याने अशा दुर्घटना होत आहे. यावर पर्याय म्हणून सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे आहे.

Web Title: Humility came to the village leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.