आयसीएमआरच्या पथकाने ५०० जणांचे घेतले रक्तजल नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:06+5:302021-06-24T04:14:06+5:30
जिल्ह्यात चौथा सर्व्हे देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाचे नियंत्रण केले जात असतानाच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने कोरोनाचा ...
जिल्ह्यात चौथा सर्व्हे
देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाचे नियंत्रण केले जात असतानाच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने कोरोनाचा प्रतिकार करण्याची शक्ती कशा पद्धतीने वाढत आहे, याच्या प्रमाणाचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी देशभरात रँडम पद्धतीने गावांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांची या सर्वेक्षणासाठी निवड झाली असून, त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. आयसीएमआरच्या पथकाने आतापर्यंत तीन सर्व्हे केले आहेत. २३ जून रोजी चौथा सर्व्हे पूर्ण करण्यात आला.
१२० मुलांचे घेतले नमुने
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पथकाने जिल्ह्यातील १२० मुलांचे रक्तजल नमुने घेतले आहेत. १२ ते १७ वर्षे वयोगटातील ८० मुलांचे आणि ६ ते ९ वर्षे वयोगटातील ४० मुलांचे नमुने घेण्यात आले. त्याचप्रमाणे २८० नागरिकांचे, त्याचप्रमाणे १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्तजल नमुने घेण्यात आले.