आयसीएमआर करणार कोरोनाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:51+5:302021-06-21T04:13:51+5:30

परभणी : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या वतीने (आयसीएमआर) जिल्ह्यात २३ जून रोजी दहा गावांना भेटी देऊन कोरोनाच्या अनुषंगाने सर्वेक्षण ...

ICMR will survey the corona | आयसीएमआर करणार कोरोनाचे सर्वेक्षण

आयसीएमआर करणार कोरोनाचे सर्वेक्षण

Next

परभणी : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या वतीने (आयसीएमआर) जिल्ह्यात २३ जून रोजी दहा गावांना भेटी देऊन कोरोनाच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले जाणार आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आयसीएमआरच्या वतीने रॅन्डम पद्धतीने गावांची निवड करून सर्वेक्षण केले जात आहे. महाराष्ट्रातून या सर्वेक्षणासाठी परभणी जिल्ह्याची निवड झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आयसीएमआरचे ३ सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता चौथा सर्व्हे २३ जून रोजी केला जाणार आहे.

आयसीएमआरचे पथक २३ जून रोजी जिल्ह्यात दाखल होणार असून, या पथकात साधारणतः १२ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. निवडलेल्या गावांमध्ये नागरिकांचे रक्तजल नमुने घेतले जाणार आहेत. किती नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडांची निर्मिती झाली आहे, याचा अभ्यास या सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, हा चौथा सर्व्हे आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे या वर्षी सर्वेक्षणात लहान मुलांचे रक्तजल नमुनेही घेतले जाणार आहेत.

या गावांमध्ये होणार सर्वेक्षण

आयसीएमआरने सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील सात गावे आणि शहरी भागातील तीन प्रभागांची निवड केली आहे. त्यात तिडी पिंपळगाव (ता. सेलू), लिंबाळा (ता. जिंतूर), टाकळी कुंभकर्ण (ता. परभणी), भोसा (ता. मानवत), वडगाव (ता. सोनपेठ), भोगाव (ता. पालम) आणि कानडखेड (ता. पूर्णा) या गावांचा समावेश आहे. तसेच परभणी शहरातील वाॅर्ड क्रमांक ६ आणि ४२ व गंगाखेड शहरातील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.

Web Title: ICMR will survey the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.