पूर्णा स्टेशनच्या पाय-यांवर लिहिले सुविचार; जनजागृतीसाठी रेल्वे प्रशासनाची नवी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:40 PM2018-01-10T15:40:29+5:302018-01-10T15:40:57+5:30
स्वच्छ रेल्वे अभियाना अंतर्गत ' रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत व महाप्रबंधकांच्या दौऱ्याच्या प्राश्वभूमिवर प्रशासनाने नवी शक्कल लढवत चक्क दादऱ्याच्या पायऱ्यावर सुविचार लिहून जनजागृती करण्यात येत आहे.
पूर्णा ( परभणी ) : ' स्वच्छ रेल्वे अभियाना अंतर्गत ' रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत व महाप्रबंधकांच्या दौऱ्याच्या प्राश्वभूमिवर प्रशासनाने नवी शक्कल लढवत चक्क दादऱ्याच्या पायऱ्यावर सुविचार लिहून जनजागृती करण्यात येत आहे.
देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी सध्या प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यात दक्षिण- मध्य रेल्वेसुद्धा अग्रेसर असून त्यांनी विविध कार्यक्रमाद्वारे स्वच्छते विषयक जनजागृती केली आहे. पूर्णा स्थानकावर देखील या अंतर्गत कामे सुरु आहेत. यात रेल्वे गाड्या, स्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. यातच आगामी काही दिवसांमध्ये दमरे चे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांचा नांदेड रेल्वे विभागात पहाणी दौरा आहे.
या दौ-याच्या पार्श्वभूमीवर विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकाची दुरुस्ती व सुधारणेचे काम सुरू आहे. जनजागृती मोहिमेंतर्गत पूर्णा रेल्वे स्थानकावर दाद-यावरील पाय-यांवर सुरेख अक्षरात प्रबोधनात्मक सुविचार हिंदी भाषेत लिहिली आहेत. पायऱ्या चढत असताना प्रत्येक प्रवाशाच्या नजरेला पडणारे हे सुविचार प्रवाशी मोठ्या कुतूहलाने वाचत आहेत तर बच्चे कम्पनी साठी ते आवडीचे ठरत आहेत. रेलव्य प्रशासनाने लढवलेली ही नवी शक्कल कुतूहलाचा बाब ठरत असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.