‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली
By admin | Published: February 13, 2017 03:29 AM2017-02-13T03:29:50+5:302017-02-13T03:29:50+5:30
शहरातील धार रोड परिसरातील डम्पींग ग्राऊंडवर जळालेल्या अवस्थेत गुरुवारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांनी यश
परभणी : शहरातील धार रोड परिसरातील डम्पींग ग्राऊंडवर जळालेल्या अवस्थेत गुरुवारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांनी यश आले आहे. राजू मुरलीधर जाधव (२५) असे या मृताचे नाव असून तो शहरातील वांगी रोडवरील साईबाबा नगर भागातील रहिवाशी होता. पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून सहा जणांनी त्याचा खून करून मृतदेह जाळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक केली असून, अन्य दोन आरोपी पसार झाले आहेत़
शहरातील धार रोड भागातील डम्पींग ग्राऊंडवर गुरुवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह घंटागाडी चालकास अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आला होता़ या प्रकरणी नानलपेठ पोलिसांनी कसून तपास केला़ त्यात निष्पन्न झालेल्या संशयितांपैकी अजय शेषराव नवघरे (१९, रा़ लहुजीनगर) याच्यासह साईबाबा नगर भागातील तीन अल्पवयीन मुलांना शनिवारी पोलिसांनी अटक केली़ (प्रतिनिधी)