ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:22+5:302021-03-04T04:31:22+5:30
परभणी-मानवत रस्त्याचे काम संथ परभणी : परभणी ते मानवत या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ...
परभणी-मानवत रस्त्याचे काम संथ
परभणी : परभणी ते मानवत या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याणहून मानवतपर्यंत काम पूर्ण झाले आहे. झिरो फाटादरम्यानच्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून रेंगाळले आहे.
प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील रस्त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. या निवाऱ्यांची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ठिबक सिंचनचे अनुदान रखडले
देवगाव फाटा : कमी पाण्यात सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत अनुदान तत्त्वावर ठिबक व तुषार सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याअंतर्गत सेलू तालुक्यातील ५६६ पैकी १२० लाभार्थींचे ३१ लाखांचे अनुदान रखडले आहे.