शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:54+5:302020-12-26T04:13:54+5:30

कृषीपंपाना दिवसा वीज पुरवठा द्या गंगाखेड - तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत सिंचनासाठी दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी विविध ...

Ignoring the demands of teachers | शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

googlenewsNext

कृषीपंपाना दिवसा वीज पुरवठा द्या

गंगाखेड - तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत सिंचनासाठी दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी विविध संघटना, शेतकऱ्यानी विज वितरण कंपनीकडे केली आहे. या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले..रात्रीच्या वेळेला शेत सिंचन करताना कडक थंडीचा त्रास होत आहे. तसेच वन्यप्राण्याची भिती वाटत असल्याने विज वितरण कंपनीने कृषीपंपाना दिवसा विज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक भुमिकेच्या पावित्र्यात आहेत.

दहा दिवस उलटूनही तपास लागेना

गंगाखेड- खरेदी- विक्री संघाच्या छत्रपती शिवाजी व्यापार संकुलातील तळ मजल्याच्या रस्त्यावर १५ डिसेंबर रोजी रक्ताचे डाग आढळून आले.दरम्यान येथे परराज्यातील भिक्षुक महिलेला मारहण झाल्याचे लक्षात आले.या घटनेला दहा उलटून गेले. भिक्षुक महिलेचा खून झाला का ती जीवंत आहे.तिला मारहण करून अपहरण केले गेले का याचा उलगडा अदयापही झाला नाही. या घटनेनंतर भिक्षुक महिला आढळून आली नसल्याने शहरात उलट सुलट चर्चा शहरात झडत आहेत.

कृष्णा कवठेकर याची निवड.

गंगाखेड- भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या तालुका सरचिटणीस पदावर कृष्णा चिंतामणराव कवठेकर याची निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र भाजपा व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष अतुल गंजेवार यानी दिले.

Web Title: Ignoring the demands of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.