गुटख्याची अवैध विक्री; तरुणावर गुन्हा दाखल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:16+5:302021-06-17T04:13:16+5:30
रवळगाव रस्त्यावर १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता एक तरुण गुटखा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ...
रवळगाव रस्त्यावर १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता एक तरुण गुटखा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, पोलीस नायक रामेश्वर मुंढे, पोलीस नायक विलास सातपुते यांच्या पथकाने पाथरी रस्त्यावरील रवळगाव पाटीजवळ अंतराने उभे राहून सापळा रचला. तेव्हा एक इसम एम.एच.२२ ए.एस.१९१६ या दुचाकीवरून अवैध गुटखा घेऊन जात असताना दिसून आला. तेव्हा दुचाकीस्वारास थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला असता रवळगाव रस्त्यावरून पाथरी रस्त्याने फुलेनगरच्या दिशेने पळ काढला. फुलेनगरमध्ये पकडताच पंचासमक्ष त्याने आपले नाव ऋतिक अशोकराव राऊत (२१, रा. रवळगाव) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता एकूण ९३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक रामेश्वर मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋतिक अशोकराव राऊत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे पुढील तपास करत आहेत.