अवैध वाळू वाहतूक ट्रक पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:27+5:302021-03-21T04:16:27+5:30
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वाळूची अवैध वाहतूक वाढली आहे. पोलीस प्रशासन वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करीत असून, वाळूसह ट्रक ...
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वाळूची अवैध वाहतूक वाढली आहे. पोलीस प्रशासन वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करीत असून, वाळूसह ट्रक जप्त करण्याच्या कारवाया दररोज होत आहेत. २० मार्च रोजी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ठोळा ते माळसोन्ना या रस्त्याने वाळू घेऊन जाणारा एक टिपर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला आहे. एम.एच.०४/सीपी३८६७ असा पकडलेल्या टिपर क्रमांक आहे. टिपर चालक अप्पाराव कोंडीबा मिरासे (रा.वझूर, ता.पूर्णा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ६ लाख रुपयांचा टिप्पर आणि १५ हजार रुपयांची वाळू असा ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दारूच्या ९२ बाटल्या पोलिसांकडून जप्त
परभणी : पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनांद्रा या ठिकाणी १९ मार्च रोजी पोलिसांनी कारवाई करीत विनापरवाना दारूविक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ९६ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी प्रताप महादेव साळवे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एम.एच.१४/एच.बी.१६०२ या दुचाकीने दारूची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ही दारू जप्त केली. त्याचप्रमाणे, परभणी शहरातील खंडोबा गल्ली, लोहार गल्ली येथे काही जण कल्याण नावाचा मटका, जुगार खेळत असताना, पोलिसांनी छापा टाकला. किशोर शिवाजी वावधाने हा जुगार चालवीत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. ५ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, किशोर वावधाने व त्याचा मालक अखिल मणियार याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.