बैलांची अवैद्य वाहतूक; एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:01+5:302021-07-20T04:14:01+5:30
देवगावफाटा येथे चारठाणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी नाकाबंदीदरम्यान तपासणी करीत असताना जालन्याकडून एमएच ०४ एफजे २०८५ क्रमांकाचा टेम्पो आला. यावेळी ...
देवगावफाटा येथे चारठाणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी नाकाबंदीदरम्यान तपासणी करीत असताना जालन्याकडून एमएच ०४ एफजे २०८५ क्रमांकाचा टेम्पो आला. यावेळी पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये ५ बैल व १ गो-हा आढळून आला. वाहन चालकाकडे पोलिसांनी याबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता ती आढळून आली नाहीत. यावेळी पोलिसांनी वाहन व जनावरे जप्त केली. यावेळी वाहनचालक हन्नान खालेक कुरेशी याने मंठा येथून व्यापारी मो. जाकेर मो. रज्जाक कुरेशी याच्याकडून आणलेले हे बैल व गो-हा परभणी येथे नेत असल्याची सांगितले. याबाबत पोलीस कर्मचारी उद्धव तातेराव सातपुते यांनी पोलिसांत शनिवारी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी हन्नान खालेक कुरेशी व मो. जाकेर मो. रज्जाक कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.