महापुरुषांच्या विचारांचे दैनंदिन आयुष्यात अनुकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:01+5:302021-02-20T04:48:01+5:30
मानवत : महापुरुषांच्या नुसत्या जयंती साजरी करून काही साध्य होणार नाही. त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला ...
मानवत : महापुरुषांच्या नुसत्या जयंती साजरी करून काही साध्य होणार नाही. त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे असतील तर त्या विचारांचे दैनंदिन आयुष्यात अनुकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रेरणाताई वरपुडकर यांनी केले. मानवत शहरातील जुन्या तहसील रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रेरणाताई वरपुडकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सरपंच माधवराव नानेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष कांचनताई कारेगावकर, डॉ. देवयानी दहे, लक्ष्मणराव साखरे, केशवराव शिंदे, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब आवचार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर लाडाने, गणेशराव कदम, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांगे, डॉ. भारत कदम, उद्धव रामपुरीकर यांची उपस्थिती होती. या शिबिरात डॉ. प्रणीता कदम, डॉ. सुनीता इक्कर यांनी जवळपास १०० हून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदाताई गजमल यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.