परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी आता लसीकरणाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:09+5:302021-07-09T04:13:09+5:30
उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जावे लागते. त्यासाठी लसीकरण बंधनकारक आहे. लसीकरणामुळे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, ...
उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जावे लागते. त्यासाठी लसीकरण बंधनकारक आहे. लसीकरणामुळे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, या उद्देशाने महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. महापालिका क्षेत्रात वास्तव्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही सुविधा उपलब्ध आहे. परदेश प्रवेशपत्र, व्हिसा आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस दिली जाणार आहे. तरी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार कोव्हॅक्सिनसह लसीकरण सुरक्षित असल्याचेही मनपाने स्पष्ट केले आहे.
१४ केंद्रांवर आज लसीकरण
दरम्यान, शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध १४ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे सत्र चालविले जाणार आहे. या सर्व केंद्रांवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. तेव्हा जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.