परभणीत आदेशाची होईना अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:13 AM2018-12-31T01:13:14+5:302018-12-31T01:13:47+5:30

राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्या विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना सवलत देण्याचे आदेश आॅक्टोबर महिन्यात काढले असले तरी परभणीतील एसटी महामंडळात मात्र अद्यापपर्यंत हे आदेश पोहोचले नाहीत़ आदेशानुसार अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी शासनाच्या सुविधेपासून वंचित राहिले आहेत़

Implementation of the Parbhani Command | परभणीत आदेशाची होईना अंमलबजावणी

परभणीत आदेशाची होईना अंमलबजावणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्या विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना सवलत देण्याचे आदेश आॅक्टोबर महिन्यात काढले असले तरी परभणीतील एसटी महामंडळात मात्र अद्यापपर्यंत हे आदेश पोहोचले नाहीत़ आदेशानुसार अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी शासनाच्या सुविधेपासून वंचित राहिले आहेत़
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे ग्रामीण भागात नियमित प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यात येते़ ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी असलेल्या लाल परीतूनच प्रवास करतात़ त्यामुळे एसटी महामंडळाला या प्रवास भाड्यातून हजारो रुपयांचे उत्पन्नही मिळते़ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या प्रवास सलवती योजनेमध्ये ९ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शासनादेश जारी केला़ या आदेशाद्वारे अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटी बसने मोफत प्रवास करण्याची योजना आहे़ या योजनेत सुधारणा करून बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना १०० टक्के मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ त्यानंतर विद्यार्थी शैक्षणिक मासिक पासमध्ये सुधारणा करून १९८६ नंतर सुरू झालेल्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्याचबरोबर अर्जुन, द्रोणाचार्य, शिवछत्रपती व दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शासनाकडून विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींनाही मोफत प्रवास सुविधा उपलब्ध केली आहे़ ४ हजार रुपये प्रति लाभार्थी प्रतिपूर्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणाºया सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत़ आजपर्यंत ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना निमआराम व सर्वसाधारण बसमध्ये ५० टक्के रक्कम देऊन प्रवास करता येत होता़ त्यामध्ये सुधारणा करून शिवशाही बसमध्ये ४५ टक्के रक्कम भरून आता प्रवास करता येणार आहे़ त्याचबरोबर कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना देण्यात येणाºया सलवतीमध्ये वाढ करण्यात आली आहे़ त्यानंतर सिकलसेल, एचआयव्ही बाधित, हिमोफिलियाग्रस्त रुग्णांनाही १०० टक्के मोफत पासची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे़
राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या प्रवास भाड्यातही सुधारणा करण्यात आली आहे़ अंध तसेच अपंग व्यक्तींना आता आधारकार्ड सलग्न स्मार्ट कार्ड एसटी महामंडळाकडून वाटप करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर रेल्वेप्रमाणे ६५ टक्के किंवा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या साथीदारास ५० टक्के रक्कम भरून प्रवास करता येणार आहे़ विशेष म्हणजे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही सर्वसाधारण, निमआराम बसमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे़
परभणी विभागात होईना लागू
राज्य शासनाने ९ आॅक्टोबर २०१८ रोजी एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या प्रवास सवलत योजनेमध्ये सुधारणा केल्या आहेत़ त्यामुळे या सुधारणांची राज्यामध्ये तात्काळ अंमलबजावणी होणे आवश्यक होते़ परंतु, परभणी विभागीय नियंत्रक कार्यालया अंतर्गत येणाºया परभणी व हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश आगारामध्ये या सुधारणा लागू करण्यात आल्या नाहीत़ त्यामुळे अनेकांना अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे़ विशेष म्हणजे राज्य शासनाचे हे पत्रकच अद्यापपर्यंत परभणीत पोहोचले नसल्याचे अधिकाºयाने सांगितले़
एसटी बस प्रवास भाड्यात सवलत योजनांमध्ये सुधारणा परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत लागू करण्यात आल्या आहेत़ एक-दोन घटकांना या योजनेचा लाभ दिला जात नसला तरी सोमवारपासून योजनेतील सवलत सुधारणेबाबतचा आढावा घेऊन शासन योजनेचा लाभ देण्यात येईल़
-जालिंदर सिरसाठ, विभागीय नियंत्रक, परभणी

Web Title: Implementation of the Parbhani Command

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.