परभणीत ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत, नऊ ठाण्यांना नवे कारभारी
By राजन मगरुळकर | Published: February 14, 2023 06:31 PM2023-02-14T18:31:37+5:302023-02-14T18:33:24+5:30
पोलिस नियंत्रण कक्ष येथे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत.
परभणी : जिल्ह्यातील नि:शस्त्र पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत. ३४ अधिकाऱ्यांच्या या बदलीच्या आदेशामध्ये जिल्ह्यातील नऊ पोलिस ठाण्यांना नवे कारभारी मिळाले आहेत.
या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव झाल्या आहेत. पोलिस अधीक्षकांच्या या आदेशाने काही ठिकाणी नवा गडी, नवा राज सुरू होणार आहे. पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या स्वाक्षरीने या बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, या ठाण्यांना नवीन अधिकारी मिळाले आहेत, सुभाष अनमूलवर - नवा मोंढा, सुनील नागरगोजे - परभणी ग्रामीण, कपिल शेळके - ताडकळस, सुनील रेजितवाड - सोनपेठ, नरसिंग पोमनाळकर - चुडावा, बुद्धीराज सुकाळे - पाथरी, कुंदनकुमार वाघमारे - जिंतूर, कृष्णा घायवट - बामणी, सरला गाडेकर - बोरी.
या विभागांना नवे अधिकारी
संतोष सानप - कोर्ट पैरवी अधिकारी, संजय करनूर - सायबर पोलिस स्टेशन, दीपक दंतुलवार-जिल्हा विशेष शाखा, गणपत राहिरे-पोलीस कल्याण विभाग, सुनील माने - वाचक अप्पर पोलिस अधीक्षक, भारत जाधव - सीसीटीएनएस प्रणाली, शिवप्रकाश मुळे - भरोसा सेल, संदीप बोरकर - एटीसी, बीडीएस, चांद इब्राहिम सय्यद - वाचक, उपविभागीय पोलिस अधिकारी, गंगाखेड. विजय राठोड - पोलिस नियंत्रण कक्ष, माधव लोकूलवार - वाचक, उपविभागीय पोलिस अधिकारी, परभणी ग्रामीण, प्रकाश पंडित - दामिनी पथक, परभणी.
नियंत्रण कक्षातील वीस जणांची बदली
पोलिस नियंत्रण कक्ष येथे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत. जवळपास २० अधिकारी पोलिस नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील पोलिस ठाणे व अन्य विभागात बदली करून हलविण्यात आले आहेत.
शहरात दोन ठाण्यांना नवे अधिकारी
नवा मोंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांची बदली झाली आहे, तसेच त्यांना पोलिस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीही मिळाली आहे. या नवीन बदली आदेशात पोलिस नियंत्रण कक्षातील सुभाष अनमूलवार यांची नवा मोंढा ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांचीही काही महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता सुनील नागरगोजे हे प्रभारी अधिकारी राहणार आहेत. शहरातील कोतवाली आणि नानलपेठ ठाण्याचे अधिकारी कायम ठेवण्यात आले आहेत.