ऐन उन्हाळ्यात कॅनलचा भराव फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी, अनेकांची शेती वाहून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 12:10 PM2022-03-25T12:10:36+5:302022-03-25T12:11:34+5:30
पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात घडली घटना
- विठ्ठल भिसे
पाथरी( परभणी): वरच्या भागातील शेतकऱ्यांननी दोन मायनर बंद केल्याने पाण्याचा दाब अचानक वाढला जाऊन मुख्य कॅनॉल च्या बँकींगचा भराव फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये बी 59 कॅनल वर शुक्रवार 25 मार्च रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे .दरम्यान पाण्यात शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणावर घासून गेली असून ऊस तोड मजुरांच्या खोप्यात पाणी शिरले आहे ,
पैठण धरण्याच्या डाव्या कालव्यातून सध्या उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी पाळी सुरू आहे , पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील मुख्य डावा कालवा पासून बी 59 ही वितरीका आहे या वितरिकेवर देवनांदर ते कुंभारी शिवारा पर्यंत जायकवाडीचे पाणी पोहचते .याच वितरिकेवर वाघाला शिवारातील जमीन येते ,सध्या वितरिका मधून पाणी सोडण्यात आले आहे शुक्रवार २५ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या गट क्रं २८३ शेतामध्ये बी ५९ कॅनॉलला करण्यात आलेल्या मातीच्या भरावाला पाण्याच्या दाबाने अचानक भगदाड पडले या. वितरिके वर वरच्या भागातील शेतकऱ्यांनी आपले सिंचन झाल्या नंतर 2 मायनर बंद केल्याने पाण्याचा दाब वाढला त्या मुळे भरावा फुटला गेला , विशेष म्हणजे कालवा तयार झाल्या पासून हा भरावं केलेला आहे
पूर्ण क्षमतेने भरून जात असलेल्या कॅनॉल मधून लाखो लिटर पाणी शेजारील शेतामधून एक किमी अंतर पर्यन्त शेतात वाहून गेले . याच शेतकऱ्याचा सध्या ऊस तोडणी सुरू आहे ऊस तोडणी साठी या शेतामध्ये आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरल्याने ऊसतोड मजुरांचे संसारोपयोगी साहित्य भिजून गेले आहे . फुटलेली कॅनॉल बँकिंग जेसीबी मशीनचा वापर करत माती, मेनकापड व कडबा च्या सहाय्याने स्थानिक शेतकऱ्याने तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केला आहे .