पाथरी तालुक्यात सतराशे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:58 PM2018-03-08T16:58:30+5:302018-03-08T16:59:39+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत.
पाथरी (परभणी ) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत.
राज्य शासनाने 2017 या वर्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. प्रत्येक खातेदारांना दीड लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय ही झाला, त्या साठी खातेदार शेतकऱ्यांकडून पतीपत्नी चे खाते ऑनलाइन अपलोड करून घेतली, खाते ऑनलाइन करताना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पाथरी तालुक्यात 56 गावात 36 हजार 933 शेतकऱ्यांनी विविध बँका मार्फत घेतलेल्या कर्जाची खाते ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. ऑनलाइन नोंदणी नंतर याद्या ग्रीन लिस्ट म्हणून शासनाने संबंधित बँकांकडे सादर केल्या. त्या याद्यांचा घोळ मागील काही महिन्यांपासून सुरूच आहे. या अर्जाबाबत बँकांनी दिलेली माहिती आणि ऑनलाइन माहिती याचा बँक स्तरावर ताळमेळ बसविण्यात येऊन याचा अहवाल सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दाखल झाला होता.यानुसार दाखल अर्जांपैकी 1 हजार 674 खाते अपात्र ठरले आहेत.
तालुकास्तरीय समिती
राज्य शासनाने कर्जमाफी संदर्भात सहायक निबंधक यांच्या अधेक्षतेखाली तालुका स्तरीय छाननी समिती गठीत केली होती, या समितीत तालुका लेखा परीक्षक , आणि संबंधित बँकांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा सामावेश आहे, या समिती कडे पाथरी तालुक्यातील 9 बँकेतील खातेदर यांचा त्रुटीतील आवाहल सादर करण्यात आला होता
जिल्हा समितीकडे अपील करता येईल
तालुका स्तरीय समितीने छाननीत अपात्र ठरलेल्या खातेदारांना जिल्हास्तरीय समितीकडे अपील करता येईल
- दिलीप गौडर, सहायक निबंधक सेलू